• Home
  • माझा जिल्हा
  • खेळतांना १० वर्षीय मुलाला मांजर चावली, काही तासांतच…
Image

खेळतांना १० वर्षीय मुलाला मांजर चावली, काही तासांतच…

प्रतिनिधी

हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका १० वर्षीय मुलावर शनिवारी सायंकाळी मांजराने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला ओकारी आली. त्यानंतर काही तासातच मुलाचा मृत्यू झाला. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (११) रा. उखळी, ता. हिंगणा असे या मृत मुलाचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास श्रेयांशू काही मित्रांसोबत खेळत होता. सायंकाळी ६ वाजता तो घरात आला. खेळत असताना मांजराने त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या पायाचा चावा घेतला. तो धावतच घरी गेला आणि घटनेबाबत आईला सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरू झाल्या. त्याच्या आईवडिलांनी त्याला डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

मांजराने चावा घेतल्याने मृत्यू ही दुर्मिळ घटना आहे. मांजराने चावा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणे कठीण आहे. मांजराच्या हल्ल्यामुळे मुलगा घाबरल्याने त्याला ओकाऱ्या आल्या. ओकारी बाहेर न येता घशातून श्वसननलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलाचा नेमका मृत्यू कशामुळे हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026