• Home
  • माझा जिल्हा
  • मुलायम सिंह यादव यांचे निधन पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
Image

मुलायम सिंह यादव यांचे निधन पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते श्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री यादव यांनी लोकांची तत्परतेने सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ.लोहिया यांच्या आदर्शांचा जनतेत प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते,असे पंतप्रधानांनी नमूद केले.श्री.यादव यांनी संरक्षण मंत्री असताना भारताला  सामर्थ्यशाली बनविण्याचे कार्य केले. श्री यादव यांच्यासोबत असलेल्या आपल्या दृढ मैत्रीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की, यादव यांचे मत ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असे. मुलायमसिंग यांच्याशी झालेल्या भेटींची छायाचित्रेही पंतप्रधानांनी सामायिक केली आहेत.श्री.मुलायमसिंग यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेद्वारे  पंतप्रधानांनी असे ट्विट केले आहे ;“श्री मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते.  लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र प्रशंसा होत असे.त्यांनी अतिशय तत्परतेने लोकांची सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ.लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.

मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.आणीबाणीच्या काळात लढणारे  लोकशाहीचे ते प्रमुख समर्थक होते.  संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भारताला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी कार्य केले.त्यांचे संसदेतील कामकाज अभ्यासपूर्ण असे आणि त्यांनी नेहमीच राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला होता.“आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह यादव यांच्याशी माझा अनेकवेळा संवाद झाला. त्यांच्याशी असलेले मैत्र पुढेही कायम राहिले, त्यांची मते ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असे.त्यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्याप्रती मी  संवेदना व्यक्त करतो.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026