मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलावर मित्रांकडूनच अत्याचार

mnewsmarathi प्रतिनिधी
March 14, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

तीन अल्पवयीन मुलांनी नऊ वर्षाच्या मुलावरच अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पीडित मुलगा आणि त्याचे मित्र एकाच भागात राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून १२ ते १५ वयोगटातील ही मुले अल्पवयीन मुलाला एका घरात नेऊन त्याच्यावर अत्याचार करीत होती. पीडित मुलाने ही बाब त्याच्या आईला सांगितली. त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करूत तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. पीडित मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा