प्रतिनिधी –
दिल्ली येथे पार्लमेंट मधील महाराष्ट्र सदन मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत पलूस येथील पलूस शिक्षण प्रसारक मंडळ व कनिष्ठ महाविद्यालय च्या किमान कौशल्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. उज्ज्वला दिनकर पाटील यांना राष्ट्रीय महिला संसद उत्कृष्ट पुरस्कार २०२४ मा. रिंचन ल्यांबो सदस्य मायनॉरिटी कमिशनर, भारत सरकार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी हिंदी अभिनेत्री नुपूर मेहता तसेच मा. अंजूबाला माजी सदस्य, एससी कमिशनर, भारत सरकार, मा. जेनिस दरबारी हेन्री कौन्सिल जनरल ऑफ मिटींग, ग्रो इन इंडिया, भारत सरकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुरस्काराने डॉ. उज्ज्वला दिनकर पाटील यांनी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे .
डॉ. उज्ज्वला दिनकर पाटील यांच्या या यशाने पलूस परिसरातून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.