• Home
  • क्राईम
  • मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले
Image

मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

प्रतिनिधी

मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या मामाला व त्यांच्या मुलाला दुचाकीवरून जाताना पाठीमागून जीपची धडक देत उडवले. त्यानंतर जीप माघारी फिरवून जखमी मुलास चिरडून ठार केल्याची घटना शेंदुरवादा ते सावखेडा मार्गावर गुरुवारी घडली. प्रथम दर्शनी अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जखमी मामाने दिलेल्या फिर्यादीनंतर वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री ८.३० च्या सुमारास नोंद झाला आहे. ऑनर किलिंग सारख्या प्रकाराने वाळूज, गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली.

या घटनेत पवन मोरे (वय २६) याचा मृत्यू झाला. शिवराम मोरे हे जखमी झाले. गंगापूर तालुक्यातील वझर येथील रहिवासी असलेले शिवराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार ते स्वतः व मुलगा पवन हे दोघे शेंदुरवादाहून दुचाकीवर बसून गावाकडे गुरूवारी दुपारी जात होते.काही अंतरावर जात असतांनाच पाठीमागून भरधाव आलेल्या (एम.एच.२० ई वाय ०६४५)  जीप चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील शिवराम मोरे हे जोरात बाजुला फेकल्या गेले. मात्र त्यांचा मुलगा पवन हा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच कोसळला. धडक देणाऱ्या चालकाने वळण घेऊन जीप आणत पवनला अक्षरशः चिरडून टाकले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक देणारे आणि दुचाकीवरील बाप-लेक हे परस्परांचे नातेवाईक आहेत. मृत पवनचे येत्या ४ एप्रिल रोजी नियोजित लग्न ठरलेले होते. शेतकरी तथा ऊसतोड मुकादम असलेले शिवराम मोरे यांचा चितेगाव येथील भाचा विशाल नवले याने धूपखेडा (ता. पैठण) येथील सचिन वाघचौरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्या रागातून सचिन याने इतरांच्या संगणमताने दुचाकीला धडक देऊन मुलाला चिरडून मारल्याचे शिवराम मोरे यांनी जबाबात सांगितले

या प्रकरणाची माहिती मिळताच वाळूजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली. मृत पवनचे वडिल शिवराम एकनाथ मोरे (४३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन भागचंद वाघचौरे (रा.धुपखेडा ता.पैठण) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने करीत आहेत.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026