मुख्य मजकुरावर जा
Saturday, 12 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 16 May 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

भोरमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 16, 2024 1 मिनिट वाचन 8,506 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

भोर तालुक्यातील पसुरे गावात कुंपण टाकण्याच्या वादातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने ग्रामस्थांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचे चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली.

भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याने बंगला (फार्म हाऊस) बांधला आहे. लष्करी अधिकारी वाकड भागात राहायला आहे. बंगल्याच्या परिसरात खांब, तसेच कुंपण बांधण्यावरुन लष्करी अधिकाऱ्याचा ग्रामस्थांशी वाद झाला. त्यानंतर अधिकाऱ्याने त्याच्याकडील बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. ग्रामस्थांना धमकावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केल्याचे चित्रीकरण मोबाइलवर ग्रामस्थांनी केले. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली.

याबाबत भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख