बारामती ! भैरवनाथ यात्रा उत्सव कोऱ्हाळे बुद्रुक आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

माझा जिल्हा

प्रतिनिधी

भैरवनाथ यात्रा उत्सव कोऱ्हाळे बुद्रुक यांनी यात्रेनिमित्त दि. 2 जून रोजी कोऱ्हाळे बुद्रुक गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बारामती तालुक्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरिता या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात प्रथम येणाऱ्या रक्तदात्याच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन तथा विद्यमान संचालक श्री सुनील तात्या भगत हे उपस्थित होते.

तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक श्री नंदकुमार आबा मोरे यांनीही या रक्तदान शिबिरास भेट दिली. तसेच वारकरी सेवा संप्रदाय पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब बारवकर, भिल्लारे महाराज, वारकरी सेवा संप्रदाय बारामती तालुकाध्यक्ष दत्तात्रेय गावडे व पत्रकार दत्तात्रेय भोसले गुरुजी यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदान केले. शिबिराची सुरुवात सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. या शिबिरास पंचक्रोशीतील युवकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने १८८ रक्तदात्यांनी उपस्थित राहून १८८ युनिट रक्तदान केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर चालू होते.

या शिबिराचे आयोजन भैरवनाथ यात्रा उत्सव कोऱ्हाळे बुद्रुक यांच्या वतीने तसेच अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते व हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच श्री.रवींद्र खोमणे उपसरंच आबा पडळकर,सामाजिक कार्यकर्ते राहुल भगत, बौद्ध युवक संघटना अध्यक्ष महेश चव्हाण, राहुल माळशिकारे, सा.प्रबुद्ध राष्ट्र संपादक प्रतिक चव्हाण, कोऱ्हाळे गावचे उद्योजक भारत माळशिकारे व प्रवीण खोमणे यांनी प्रयत्न केले