टिचभर रॉयल्टी भरून इथभर मुरूम वाहतूक करणाऱ्यांना बारामती तालुक्यात आशीर्वाद कुणाचा.?.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

बारामती तालुक्यातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड निष्ठत चालली आहे की काय अशी चर्चा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. बारामती तालुक्यात मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे मात्र तहसीलदार, सर्कल,तलाठी. यांच्यासमोर टिचभर रॉयल्टी भरून इथभर मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. बारामती तहसील मुरूम वाहतूक करणाऱ्या मुरूम माफीयां च्या विरोधात कारवाई करण्यासाठी हतबल झाली आहे की काय? अशी देखील चर्चा सध्या बारामती तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे दिवसाढवळ्या खुल्या मुरूम वाहतूक करणारे यांना कोणाचीच भीती राहिली नाही का टिचभर रॉयल्टी भरून इतभर मुरूम वाहतूक करणारे वाहतूक करत असताना वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसून वाहतूक करीत आहेत याकडे कोणाचाच लक्ष नाही का का लक्ष देणाऱ्यांनाच पाकीट देऊन शांत केलं जात आहे? अशी देखील चर्चा बारामती तालुक्यातील सामान्य नागरिकांमधून केली जात आहे ओव्हरलोड वाहतूक करणे गाडीत कर्कश्य आवाजात टेप रेकॉर्डर चालू ठेवणे स्पीडची मर्यादा ओलांडणे आशा अनेक प्रकारामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मुरूम माफियांवरती कारवाई केली जाणार का. की टिचभर रॉयल्टी भरून इथभर मुरूम वाहतूक अशीच सुरू राहणार?