Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना
Image

मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना

प्रतिनिधी

 जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. या प्रवाशाचे नाव मनोज कुमार (वय ४०) आहे. तो सायंकाळी ६.३० वाजता स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होता. त्यावेळी तो अचानक जिन्यावर पडला. स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने त्या प्रवाशाला स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. तिथे कक्षातील डॉक्टर आणि परिचारिकेने या प्रवाशावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. या प्रवाशाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. याचबरोबर या प्रवाशाला काही आजार होता का, याचाही उलगडा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर होणार आहे. हा प्रवासी सरकत्या जिन्यावर कशामुळे पडला, याची तपासणी पोलीस करीत आहेत.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026