• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैष्णवांची मांदियाळी – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘ जयघोषात भक्तिमय वातावरणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत .
Image

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैष्णवांची मांदियाळी – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘ जयघोषात भक्तिमय वातावरणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत .

प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी निरा नदीकाठी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सदर कार्यक्रमात बाल वारकऱ्या सोबत गावातील आबाल वृद्धांनी सहभाग नोंदवला . अभंगावर फेर घालून महिलांनी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘या मंत्राचा जयघोष केला .शाळेतील सर्व विद्यार्थी बाल वारकरी रूपामध्ये हजर होते . विद्यार्थी, शिक्षक, माता भगिणी यांनी फुगडी चा आनंद लुटला . ग्रामस्थांच्या वतीने भावीक भक्तांना मिठाई, बिस्किट चहा -पान आदींचे वाटप करण्यात आले .

पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थी वर्गासाठी आकर्षणाचा विषय म्हणजे अश्व रिंगण सोहळा .सर्वांच्या उपस्थितीत अश्व रिंगण सोहळा पार पाडल्याने भक्तीमय वातावरणात सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला . मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ . सुनिता शिंदे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत ग्रंथदिंडी पालखीचे आयोजन करून असाक्षर लोकांचे सर्वेक्षण केले . शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले . दिंडी सोहळ्यामध्ये सुरू असलेल्या असाक्षर लोकांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यात आली . सर्वसाधारणपणे २ तास वैष्णवांची मांदियाळी ग्रंथदिडी पालखी सोहळा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संपन्न झाला . विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये आनंद लुटला.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025