नाथ्रा येथे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनानातील विविध पुरस्कारासाठी 16 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन- डॉ.एकनाथ मुंडे

Uncategorized

प्रतिनिधी

श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने सहावे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनाची नाथ्रा येथे मंगळवार दि. 3 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनात विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी ग्रामिण मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन संयोजक डॉ.एकनाथ मुंडे नाथ्राकर यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी व ग्रामीण साहित्याची ओळख आणि महत्व अखंड राहण्यासाठी साहित्य रसिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीनाथ मानव सेवा मंडळाने डॉ. एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. आज पर्यंत संस्थेने पाच ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करून परिसरातील आणि विविध जिल्ह्यातील नवोदित कवी, लेखक, साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले व ग्रामीण मराठी साहित्याचा जागर घातला.

हीच परंपरा पुढे चालू ठेवत ह्याही वर्षी ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे मंगळवार दि.03 व 4 जानेवारी 2023 रोजी आयोजन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून होत आहे. अशा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य , कला, पत्रकार, लेखक, सांप्रदायिक क्षेत्रातील संतभूषण, कवी, उद्योजक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिक, कवी, लेखक ,गायक, क्रीडा, उद्योग, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, संगीत, अशा विविध क्षेञातील मान्यवराना विशेष योगदान देणार्‍या व्यक्ती, संस्थांना आदींचा भव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नाथ्रा येथे पार पडणार्‍या या ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात कवी, शाहिर, लोकगिते, कलाकार, भारुड, कथा कथन, भजन, गवळणी या सर्व प्रकाराच्या गायनासाठी परिसरातील साहित्यीक, कवी, विद्यार्थी यांनी नाव नोंदणी करावी, तरी या पुरस्कारासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला कार्याचा अहवाल श्रीनाथ मानव सेवा मंडळ, कार्यलय,श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ,या पत्त्यावर दि.16 डिसेंबर 2022 पर्यंत पाठवावे असे आवाहन श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष व साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ एकनाथ मुंडे यांनी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क 9850249393, 9850119393, 8149221212 साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.