बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये सी सी टीव्ही बसवण्याची गरज ?
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने वडगांव निंबाळकर मध्ये सी सी टिव्ही बसवण्याची गरज भासत आहे . याचबरोबर हे सी सी टिव्ही वडगाव निंबाळकर मध्ये बसवण्यात आले तर याठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना रोखण्यासाठी व चोरटे शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाला तपास करणे देखील सोपे पडणार आहे .
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे देखील वडगाव निंबाळकर मध्ये कुटल्याही प्रकारची दुर्घटना घडली यावरती लक्ष्य ठेवता येणार आहे . पाऊस कमी झाला आहे पुन्हा ड्रोन फिरण्यास सुरवात झाली असून वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गाव ग्रामपंचायत यांना पोलिस प्रशासनाकडून नोटीस दिले गेले होते की चौकांमध्ये व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सी सी टिव्ही बसवण्यात यावे मात्र पोलिसांच्या या नोटीसल सर्व ग्रामपंचायत प्रशासनाकडून केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे ? या वाढत्या चोऱ्यांना रोखण्यासाठी वडगांव निंबाळकर मध्ये सी सी टिव्ही बसवण्याचे गरजेचे आहे अशी ग्रामस्थांची मागणी आहे .
