वाघळवाडीतील या मतदाराला का लावावा लागला दारावरती असा बॅनर?.

राजकीय

संपादक मधुकर बनसोडे.

बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ची निवडणूक लागली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वागळवाडीतील सुरेश यादव यांनी आपल्या दरवाजा बाहेर एक संदेश देणारा बॅनर लावला आहे आणि या संदेश मध्ये असं म्हटलं आहे.

समाजकंटक,भ्रष्टाचारी, व भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या उमेदवारांनी मत मागणी करता आल्यास अपमानित करण्यात येईल. या मतदारास असा बॅनर लावण्याची वेळ का आली यावरती राज्यकर्त्यांनी खरंतर विचार केला पाहिजे. वागळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांनी गावच्या विकास कामात कुठेही कसर सोडली नाही असं वारंवार सांगितलं आहे? तर विरोधक म्हणतात विकास नक्कीच झाला आहे पण गावचा न होता सत्ताधारी पक्षातील काही राजकीय नेतेमंडळींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे?

वाघळवाडी ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेली आहे. मग सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत लावलेले बॅनर असो अथवा इतर गोष्टींनी चर्चेत राहिलेली वागळवाडी ची ग्रामपंचायत निवडणूक यंदा देखील आटातटीचीच होणार आहे असे देखील मतदारांमधून बोलले जात आहे.