बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीत एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरलाच लुटारूंनी लुटले! मग काय बारामती तालुका पोलीसांनी अवघ्या चार तासातच आरोपींना ताब्यात घेतले.

Uncategorized

प्रतिनिधी

बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. 4/12/2022 रोजी रात्री 08/30 वा चे सुमारास महिला सोसायटी समोरील ऑक्सीजन प्लांट जवळ एमआयडीसी बारामती येथे इसम नामे देवेंद्र संतोष वेताळ वय- 21 वर्ष व्यावसाय-वैद्यकीय शिक्षण रा. सध्या बॉईज हॉस्टेल मेडिकल कॉलेज बारामती. हा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकटाच सुभद्रा मॉल पेन्सिल चौक येथे पायी चालत गेला होता .तो खरेदी करून परत एकटा बॉईज हॉस्टेल दिशेने चालत येत असताना ऑक्सिजन प्लांट चे जवळ एक अज्ञात इसम मोटरसायकल वरून आला व त्याने शिवीगाळ दमदाटी करून देवेंद्र यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये जबरदस्तीने मारहाण करून काढून घेतले त्या ठिकाणी दुसऱ्या मोटरसायकल वरती आणखी दोन इसम आले पैसे काढून घेतलेला व्यक्ती व ते एकमेकांशी बोलू लागले त्यावेळी पैसे घेतलेला व्यक्ती बाकी दोघांना सांगू लागला की मी याचे काढून घेतलेले पैसे हा मला परत मागत आहे .त्यामुळे चिडून जाऊन त्या तीन व्यक्तींनी देवेंद्र वेताळ यास हाताने मारहाण शिवीगाळ दमदाटी केली व देवेंद्र यास त्यांनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवले व गोरड हॉस्पिटल पाठीमागील शेतात घेऊन गेले त्या ठिकाणी त्याला कपडे काढून उसाने डोक्यात व मांडीवर मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा अंगठा फॅक्चर झाला. तसेच कपडे नसलेला त्याचा फोटो त्यातील एका चोरट्याने त्याच्या मोबाईल मध्ये काढून घेतला व तू आम्हाला अजून पैसे दे नाहीतर मोबाईल मध्ये काढलेला फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिली त्यावरून फिर्यादी देवेंद्र यांनी घाबरून जाऊन तुम्हाला मी आणखी पैसे काढून देतो असे करू नका असे म्हटल्या नंतर सदर इसम यांनी त्याला आयसीआयसी आय बँकेचे एटीएम जवळ घेऊन गेले त्यातील एका इसमाने तोंडाला काळे रंगाची कापडी पट्टी बांधून फिर्यादी बरोबर एटीएम मध्ये प्रवेश करून दहा हजार रुपये काढून घेतले व नंतर चार हजार पाचसे काढले त्यानंतर त्याला तेथे सोडून हे तिन्ही इसम पळून गेले.

त्यानंतर देवेंद्र रिक्षा स्टॅन्ड वर गेला व तिथून तो महिला हॉस्पिटल येथे उपचार कमी दाखल झाला. या घटनेची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ तपास पथक सदर ठिकाणी पाठवले. व योग्य त्या सूचना दिल्या. महिला हॉस्पिटल या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे पो. कॉ.संतोष मखरे हे पोहोचले नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्या अनोळखी तीन लुटारूंचा शोध घेण्यास सुरुवात केली ,अथक परिश्रम घेतल्यानंतर व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने सदर तीन इसमांना अवघ्या चार तासाच्या आत मध्ये शोधून त्यांना गजाआड केले आहे. त्यांची नावे

1.राहुल धोंडीबा उघाडे वय-23 वर्ष धंदा- स्क्रॅप व्यवसाय रा. पाहुणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे

2. सुमित किशोर पवार वय-24 वर्ष धंदा -फॅब्रिकेशन व्यवसाय रा. बांदलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे.

3. भूषण भास्कर रणसिंग वय-20 वर्ष धंदा -शिक्षण राहणार मार्केट यार्ड रोड बारामती जि. पुणे अशी आहेत .

या सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना दिनांक 09/12/2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.सदरची कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा.श्री आनंद भुईटे सो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, पो. हवा. राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे व दीपक दराडे यांनी केली आहे. गुनहयाचा पुढील अधिक तपास स .पो .नि. श्री राहुल घुगे हे करीत असून या आरोपींनी यासारखे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल तपास ते करीत आहेत.