बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग – डेंग्यु, चिकनगुण्या , मलेरिया , झिंका विषयी जनजागृती अभियान

माझा जिल्हा

प्रतिनिधी –

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग आजाराचा प्रादुर्भाव अंतर्गत डेंग्यु,मलेरिया, चिकनगुण्या,झिंका या आजारा विषयी विद्यार्थी, पालकामध्ये जनजागृती करण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात आले . सदर आजार बाबत माहिती सुप्रिया सावरकर मॅडम तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी दिली. तसेच आरोग्य निरीक्षक अशोक मोरे यांनी जैविक उपाय योजना म्हणून डास उत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे बाबत माहिती सांगितली .

आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे बाबत यावेळी सांगण्यात आले . अतुल कांबळे आरोग्य सेवक यांनी वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता या बाबत माहिती देऊन गप्पी मासे व डासाच्या अळ्या याच्या प्रात्यक्षिक हिम्मत कौले आरोग्य सेवक यांनी दाखवले. मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते, उपशिक्षक रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे , सौ मनिषा चव्हाण , अंगणवाडी सेविका गायकवाड मॅडम सर्व विद्यार्थी, पालकांनी सदर कार्यक्रमाची माहिती घेतली .