प्रतिनिधी
मुंबई..
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक निवासस्थान राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे ही आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यासाठी आंबेडकर कुटुंबियांशी बोलून त्यांचे योग्य समाधान करावे तसेच चैत्यभूमी चा स्तूप नागपूर मधील दिक्षाभूमी सारखा भव्य प्रमाणात उभारावा ;चैत्यभूमी जवळचा रस्ता समुद्र किनाऱ्यावर भराव घालून रस्ता मोठा आणि रुंद करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त रिपब्लिकन पक्षातर्फ़े आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी शिक्षणमंत्री आणि मुंबई चे पालक मंत्री दीपक केसरकर; सभेच्या अध्यक्ष स्थानी रिपाइं चे नवनियुक्त मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; माजी मंत्री अविनाश महातेकर; महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले; ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र जित आठवले; गौतम सोनवणे; परिवर्तन कला महासंघाचे प्रमुख आणि रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष साहेबराव सुरवाडे ; सौ शिलाताई अनिल गांगुर्डे; अमित तांबे; सुमित वजाळे; अनेक मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समिती चे अध्यक्ष नसते तर संविधान कसे निर्माण झाले असते.बाबासाहेब नसते तर आपण कोणी नसतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले म्हणून आपण आपल्या अधिच्या पिढ्या घडल्या आणि आपल्या नंतर च्या ही पिढी घडणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची शक्ती ; भक्ती आणि आमची मुक्ती आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.दरवर्षी रिपाइं तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्तछत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जाहीर अभिवादन सभा आयोजित करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना संकटामुळे खंड पडल्या नंतर या वर्षी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत यंदा प्रचंड मोठी जाहीर अभिवादन सभा संपन्न झाली.या जाहीर अभिवादन सभेला आंबेडकरी जनता मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो; पप्पू कागदे; सुरेश बारशिंग; रमेश गायकवाड; श्रीकांत भालेराव;संजय डोळसे;बाळासाहेब गरुड;विवेक गोविंदराव पवार;चंद्रकांता सोनकांबळे; संगीता आठवले; ऍड.आशा लांडगे;डॉ विजय मोरे; घनश्याम चिरणकर; सुरेश जाधव; कोल्हापूर चे अध्यक्ष उत्तम कांबळे; पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण ;दयाळ बहादूर; साधू कटके; ईश्वर धुळे; सौ. नैना संजय वैराट; अंकुश गायकवाड; योगेश शिलवंत; विनोद जाधव; अजित रणदिवे;सोना कांबळे;आदी रिपाइं चे राज्य भरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. रिपाइं चे नवनियुक्त मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी त्यांच्या अध्यक्षतेत पहिल्याच वर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या जाहीर अभिवादन सभेचे आयोजन उत्कृष्टरित्य यशस्वी केले.