प्रतिनिधी.
मधुकर बनसोडे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम आपण नेहमी पाहत असतो, ऐकत असतो.
मात्र निंबुत येथील श्री मदनराव काकडे यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या सवंगड्या सोबत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला .आणि त्या व्हाट्सअप ग्रुपला समाजसेवा असे नाव दिले
या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असतात अनेक समाजसेवक या चर्चेमध्ये सहभागी होत असतात. ग्रुपचं नाव समाजसेवा आहे म्हटल्यावर समाजसेवा तर झालीच पाहिजे असे विचार ग्रुप ॲडमिन मदनराव काकडे यांनी काही वर्षांपूर्वी ग्रुपवर मांडले आणि त्यावेळेस सांगली शहराचे पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते .
त्यावेळी याच समाजसेवा ग्रुपच्या वतीने सांगलीकरांसाठी अन्न,वस्त्र, काही औषधे, चटया, चादर, सतरंजी, पशुधनासाठी गोळी पेंड, भुसा, असे जीवनावश्यक साहित्य पाठवून ग्रुपच्या नावाला साजेल असे कार्य केले होते.
कोविड काळामध्ये ग्रुपच्या वतीने जवळपास 14 कोविड सेंटर साठी आर्थिक मदत देखील केली होती. तसेच पाटण तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना देखील समाजसेवा ग्रुप च्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली होती.
या ग्रुप मध्ये राजकीय चर्चा रंगतात, वाद होतात अशावेळी विधानसभेमध्ये सदस्यांचा गदारोळ झाल्यानंतर जशी विधानसभा तहकूब केली जाते त्याचप्रमाणे समाजसेवा ग्रुप देखील काही वेळासाठी ग्रुप ॲडमिन सेटिंग करून, ती चर्चा तहकूब केली जाते.
ग्रुपमध्ये कोणी चुकीची पोस्ट टाकली अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केली तर संबंधित सदस्याला ग्रुपमधून लगेच निलंबितही केले जाते.
या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप सदस्यांसाठी छोट्या-मोठ्या सहली/ ट्रेक आयोजित केले जातात. या ग्रुपच्या माध्यमातून भविष्यामध्ये
ग्रुप आँफ कंपनी करून फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करीत आहे व ग्रुप सदस्यांना आर्थीक सुबत्ता कशी राहिल या वर भर दिला आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समाजसेवा ग्रुप वर विविध विचारांचे, विविध पक्षाचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, नागरिक हे सदस्य आहेत.
आता या समाजसेवा ग्रुप ला जवळपास दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्ती निमित्त ग्रुप ॲडमिन मदनराव काकडे, व योगेश यादव सरजी यांच्या विचारातून ग्रुप साठी एक मोठा दशकपूर्ती सोहळा आयोजित करण्याचे कार्य हाती घेतल्याचे समजते. व्हाट्सअप ग्रुप वर गुड नाईट गुड मॉर्निंग मेसेज टाकुनच एकमेकांबद्दल आदर व्यक्त करण्यापेक्षा संपूर्ण देशाने या समाजसेवा ग्रुपचा आदर्श घेऊन व्हाट्सअप ग्रुप काय करू शकतो हे दाखवून देणं हे काळाची गरज आहे.