• Home
  • माझा जिल्हा
  • सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपला – सुधीर मुनगंटीवार
Image

सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपला – सुधीर मुनगंटीवार

लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्‍याची शोक भावना सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्‍द असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटातुन त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातुन ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्‍तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्‍या मुखडयाची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहीजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्‍यय त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांतून येतोच. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्‍त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्‍यांनी लावणीच्‍या माध्‍यमातुन रसिकप्रेक्षकांच्‍या मनावर उमटविलेला ठसा कधिही विसरू शकणार नाही. त्‍यांनी गायलेल्‍या लावण्‍यांनी जनमानसांच्‍या हृदयात मानाचे स्‍थान मिळविले आहे. लावणीला राजमान्‍यता, लोकमान्‍यता व प्रतिष्‍ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्‍या निधनाने या क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली असल्‍याचे सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026