• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान हा कार्यक्रम संपन्न*.
Image

काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान हा कार्यक्रम संपन्न*.

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय निवडणूक आयोग व उपविभागीय कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री. रमेश कवितके सर उपस्थित होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस, पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी कवितके सरांनी विद्यार्थी व शिक्षकांना राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार सर्व नागरिकांनी यशस्वीपणे मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे व मतदान टक्केवारी शंभर टक्के कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना, आई-वडिलांना याची माहिती देऊन त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. व अठरा वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान हक्क बजावला पाहिजे . तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान नाव नोंदणी करावी असे आव्हान केले व शेवटी मतदार जनजागृती प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल गोलांदे यांनी केले तर आभार पृथ्वीराज वाघमारे यांनी मानले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026