बारामती ! तालुकास्तरीय मल्लखांब प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न .

Uncategorized

प्रतिनिधी –

पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती यांच्या उपक्रमाशिल शाळा अंतर्गत पुणे येथे जिल्हास्तरावर कार्यशाळा शिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाने झाली होती .सदरच्या कार्यशाळेमध्ये मल्लखांब बाबत मार्गदर्शन करण्यात आले होते .त्याचाच भाग म्हणून पंचायत समिती बारामती माननीय गटशिक्षणाधिकारी श्री निलेश गवळी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे तालुकास्तरीय मल्लखांब प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले . शिरवली केंद्राच्या आदर्श केंद्रप्रमुख सौ शोभा सावंत कांबळेश्वर चे मल्लखांब तज्ञ मार्गदर्शक श्री विनोद गायकवाड , ज्ञानदेव सस्ते मुख्याध्यापक कांबळेश्वर, शिर्सुफळ शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर , रुई शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर, बजरंगवाडी शाळेचे उपशिक्षक राहुल गायकवाड सर ,श्री रेवणनाथ सर्जे, सौ सुनीता शिंदे, सौ मनीषा चव्हाण सर्वाच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला .

मागिल दोन वर्षापासून श्री विनोद गायकवाड मार्गदर्शक यांच्या सहकार्याने शाळेत मल्लखांब उपक्रमाला सुरुवात झाली असून कांबळेश्वर शाळेमध्ये सादरच्या उपक्रमात वीस विद्यार्थी सहभागी असून दररोज सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये प्रशिक्षक मार्गदर्शक श्री विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विनामूल्य मल्लखांबाचे धडे देण्याचे काम सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच शरीर लवचिकता, व्यायामाचे महत्त्व, बालवयात विविध
कसरतीचे खेळ सातत्याने कांबळेश्वर शाळेमध्ये मागील दोन वर्षापासून सुरू असून मल्लखांब मध्ये अनेक विद्यार्थी तरबेज झाले असून सकाळच्या वेळेमध्ये पालक स्वतः आपल्या विद्यार्थ्यांना श्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मललखांब प्रकार ,व्यायाम, कुस्ती सारख्या लोप पावत चाललेल्या विद्या विद्यार्थांना दिल्या जात आहेत . विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचे काम मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ पालक वर्ग शाळेच्या विविध उपक्रमातून सदरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे .

शाळेतील उपशिक्षिका सौ . मनीषा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी ते चौथी मधील ४०विद्यार्थी परकीय भाषा वर्ग सुरू असून सदरच्या वर्गातील जर्मन भाषा बाबत ही केंद्रप्रमुख सौ शोभा सावंत यांनी माहिती घेतली . विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेमधून उपस्थित लोकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला अंक नावे सांगणे, सूचना अशा विविध सोप्या घटकावरती जर्मन भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असेल सदरच्या उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला . अबॅकस वर्ग शाळेमध्ये सुरू असून मार्गदर्शक शितल भगत यांनी प्राथमिक टप्प्यात लेवल एक व दोन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून गणन प्रात्यक्षिके सादर केली सदरचा उपक्रमाचा फायदा शाळेला झाला असून विद्यार्थ्यांची पट वाढ होत असून विद्यार्थी गणन ,वाचन, लेखन क्षमता वाढ आकलन शक्ती अशा विविध गोष्टींचा फायदा अबॅकस मुळे झाल्याचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले.

मल्लखांब बाबतची प्रात्यक्षिके शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे केली यामध्ये प्रामुख्याने दसरंग, साधी हातावरील उडी, कुर्मासन, साधी तेढी, बजरंगी, पोटाचा ताजवा , मल्लखांबा वर बसणे अशा विविध मल्लखांब कसरती विद्यार्थांनी सादर केल्या उपस्थित सर्वांनी मुलांचे शाळेमध्ये सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले . शाळेतील उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्ज यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली .