प्रतिनिधी
निंबुत श्री शिवाजी काकङे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, सोरटेवाडी आणि गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार रंगतदार स्थितीत आला आहे. सोमेश्वर कारखाचे संचालक श्री अभिजीत काकङे यांच्या नेतृत्वाखाली असलेला पँनेलचे पारडे जङ असलेचे बोलले जात आसुन विजयाची खाञी असल्याचे बोलले जाते .
इतर गावात राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, हे येत्या 20 तारखेला स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषदेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. गावावर आपलीच सत्ता असावी, यासाठी दोन्हीही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही गावांत उमेदवारांवरून मोठी नाराजी आहे. याचा फटका दोन्हीही बाजूंकडील उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख पदाधिकार्यांचा या निवडणुकीत कस लागला आहे.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांत मोर्चेबांधणी करण्यात आली. बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, पदाधिकार्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक दोन्ही गटांत आतापर्यंत जोरदार टक्कर पाहायला मिळाली आहे. भाजपनेही आता निवडणुकीत उतरत रंगत आणली आहे.उच्चशिक्षित तरुण रिंगणातजनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने चुरस वाढली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण या निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत. दोन्हीही गटांनी बॅनर, वाहने, मतदारांच्या बैठका घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. पॅनेलप्रमुख व उमेदवारांना अनेकांची नाराजी दूर करावी लागत आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडावा लागत आहे. वाघळवाङी तीन पँनेल विजय होण्याचे दावे करत आहे मुरुम मध्येही सर्व पँनेल निवङुन याःन्याचे दावे करीत आहेत गङदरवाङी ग्रामपंचायत मध्ये भाजप आणी राष्ट्वादी पुरस्कृत दोन पँनेल असुन तीन पँनेल मध्ये लढत आहे सोमेश्वरचे संचालक श्री आभिजीत काकङे यांच्या नेतृत्वाखाली पँनेल असुन सध्या या पँनेलचे पारडे गङदरवाङी जङ असल्याचे बोलले जाते एकदरीतच 20 ङिसेंबरला निकाल लागल्यावरच सर्व चिञ स्पष्ट होईल