प्रतिनिधी –
नऊ वर्षाच्या मुलाचा भिंतीवर आपटून व गळा दाबून बापानेच खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील होळ या गावी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बारामती तालुक्यातील होळ या गावी पियुष विजय बंडलकर वय ९ वर्षे याला त्याचे वडील विजय गणेश भंडलकर रा. होळ ता. बारामती जि.पुणे यानी पियुष अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणार दिसतोय असे म्हणून त्यास मारहाण करून त्याचा गळा दाबून व त्याला भिंतीवर आपटून त्याचा खून केला .
ही घटना आई शालन गणेश भंडलकर यांनी ही कृत्य करत असताना विजय बंडलकर याला थांबवले नाही. व विजय बंडलकर याच्या सांगणे प्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहिती पसरवली . तसेच यातील संतोष भंडलकर याने देखील भट्टड डॉक्टर यांचे येथे पियूष ला घेऊन गेल्यानंतर तेथे विजय भंडलकर यांचे सांगणेनुसार पीयुष चक्कर येऊन पडल्याचे डॉक्टरांना खोटी माहिती दिली.
पियुष याला हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी पियुष हा मयत झाल्याचे सांगितले व होळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घेऊन जाणे बाबत कळवले असताना देखील त्यांनी संगनमताने जाणीवपूर्वक विजय भंडलकर यांनी पियुष याचा खून केला आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये व त्याबाबतचा पुरावा राहता कामा नये यासाठी सदरची मयत बॉडी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ या ठिकाणी न नेता पियुष ची बॉडी होळ या गावी घरी घेऊन गेले.
व या मयताबाबत पोलीस पाटील,आगर इतर कोणालाही कळवले नाही त्यांनी त्याचे नातेवाईक बोलावून घेऊन मयत पियुष याच्या अंत्यविधीची तयारी केली होती . याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर सर्व रा होळ ता. बारामती यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहे .