प्रा. हनुमंत माने यांना राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर…

Uncategorized

सोमेश्वरनगर…
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी प्रशिक्षक प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला “काव्यसंकल्प” राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास “शब्दगंध” साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
“काव्यसंकल्प” या कवितासंग्रहात संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक बारा कवींच्या प्रत्येकी आठ कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
हा कवितासंग्रह आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे.
“काव्यसंकल्प” हा प्रातिनिधिक कवितासंग्रह “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मकथनाचे लेखक माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाला सस्नेह अर्पण केलेला आहे.
या कवितासंग्रहाला
प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
प्रा. हनुमंत माने यांना
राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष- श्री. राजेंद्र उदागे सचिव- श्री. सुनील गोसावी कार्याध्यक्ष-श्री. ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली आहे.