प्रतिनिधी.
निरा येथील ज्योतिर्लिंग इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॅपिटल किड्स नीरा येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रजासत्ताक दिनाचा आनंद उत्सव साजरा केला.
या कार्यक्रमासाठी जीवनदीप हॉस्पिटलचे डॉ. रोहन लकडे व त्यांच्या पत्नी प्रसकंदा रोहन लकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. यावेळी डॉ श्री मच्छिंद्रनाथ मेरगळ सर संस्थापक ज्योतिर्लिंग इंग्लिश मीडियम स्कूल हे देखील उपस्थित होते.
यावेळी स्कूलच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वकृत्वाने आलेल्या पाहुण्यांचे मन जिंकले.
सौ प्रसकंदा रोहन लकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षणाबद्दल चे महत्व पटवून देत आजची तरुण पिढी हीच उद्याचे देशाचे भविष्य,भवितव्य आहेत मुलांनी शिक्षणाकडे व पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे असे देखील सांगितले. तसेच सौ लकडे यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना प्रत्येकच मुलगा, डॉक्टर,वकील, इंजिनियर, शिक्षक, होणार नाही मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे असे देखील यावेळी बोलताना सांगितले.
स्कूलच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा उचित सन्मान करून. मुलांना गोड खाऊ वाटप करीत कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पालक वर्ग, स्कूल मधील टीचर सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.