सोमेश्वर कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर कारखाना प्रशासनाने त्वरित तक्रार पेटी बसवावी अशी मागणी सभासद करीत आहेत.

माझा जिल्हा

संपादक.मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात टाईम ऑफिस सह इतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ती कायदेशीर कारवाई करू असे आदेश संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये झाले. मात्र काल उशिरापर्यंत अद्याप कोणावरतीही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळत आहे? नक्की अजून कारखाना प्रशासनाने गुन्हे का दाखल केले नाहीत याची चर्चा सभासद वर्गांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे या सर्व प्रकरणांमध्ये वेगळाच कोणीतरी अक्का नाही ना त्या अक्काला वाचवण्यासाठीच कारखाना प्रशासन गुन्हे दाखल करण्यामध्ये दिरंगाई करत आहे का? आशा देखील चर्चा सभासदांमधून होत आहेत. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर सभासदांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना कारखाना प्रशासनाने त्वरित एक तक्रार पेटी कामगारांसाठी उपलब्ध करावी व त्या तक्रार पेटी मधील तक्रारीचे पत्र संचालक मंडळाच्या समोरच खोलावेत अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासद करीत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याची तक्रार कोणताही कामगार करत असताना त्याला अनेक अडचणी येत असतात त्यामुळेच तक्रार पेटी उपलब्ध झाल्यास कारखाना हितासाठी कोणताही कामगार आपली निनावी तक्रार त्या पेटीमध्ये टाकू शकेल यामुळे भविष्यात असे कृत्य होणार नाही असे देखील सभासदांमधून बोलले जात आहे.