प्रतिनिधी.
(गुन्हेगारांवरती जरब बसविण्यासाठी दोन महिण्यात सहा जणांना केले तडीपार)
यातील हद्दपार इसम यांचेवर बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच बारामती शहर पोलीस ठाणेत नागरीकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे लोकांना दमदाटी करून त्यांचेकडुन पैसे उकाळणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे मेडद ता. बारामती जि.पुणे या गावातील टोळी प्रमुख महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद, वय ३२ वर्षे, टोळी सदस्य १) टोळी सदस्य सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद, वय-२२ वर्षे रा. मेडद ता. बारामती जि. पुणे. तसेच इंद्रजित माणिक सोनवणे, वय-२५ वर्षे रा. क-हावगज ता. बारामती जि. पुणे. यांना ०१ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह) सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपार करण्यात आले आहे. या गावगुंडांच्या वाढलेल्या दहशतीमुळे सर्वसामान्य लोक, मजुर, नोकरदार वर्ग गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, उपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक या सर्वांना यांच्या गुन्हेगारी कृत्यापासुन भयमुक्त करण्यासाठी व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांचेवर कायदयाचा धाक राहणे आवश्यक असलेने त्यांना संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून वरील नमुद इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर तडीपार प्रस्तावाची मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी सखोल चौकशी करुन वरील नमुद इसमांना ०१ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयसह) सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपारचे आदेश केले आहेत.
सदरची कारवाई मा. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डॉ.श्री. सुदर्शन राठोड सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सचिन लोखंडे, तसेच प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री तुषार भोर, पो.कॉ.श्री.जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे. सदर कामी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील स. फौ श्री. महेश बनकर, पो हवा श्री रामदास बाबर यांचे सहकार्य लाभलेले आहे.