• Home
  • माझा जिल्हा
  • अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार
Image

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार

प्रतिनिधी

पुणे, दि. १२: भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली.

या योजनेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, आदी महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे.

या पुनर्विकासात पुणे जंक्शन, शिवाजीनगर स्टेशन, लोणावळा स्टेशनसह नऊ स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. बारामती स्टेशन (११ कोटी ४० लाख रुपये), दौंड (४४ कोटी), केडगाव (१२ कोटी ५० लाख), आकुर्डी (३४ कोटी), चिंचवड (२० कोटी ४० लाख), देहू रोड स्टेशन (८ कोटी ५ लाख), तळेगाव स्टेशन (४० कोटी ३४ लाख), हडपसर स्टेशन (२५ कोटी रुपये) तसेच उरुळी स्टेशनच्या विकासासाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025