• Home
  • माझा जिल्हा
  • श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…
Image

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

प्रतिनिधी.
कागज और कलम की ताकत
दुनिया की हर ताकत से बड़ी हैं,
एक रोटी कम खाओ पर बच्चों
को जरूर पढ़ाओ |
असे म्हणणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन, संस्थेचे मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. व डिजिटल M न्यूज मराठी चॅनल चे संपादक मा. श्री मधुकरराव बनसोडे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात डॉ.बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
इ. ८वी तील कु.अनुराधा ननावरे हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आपल्या मनोगतातून माहिती सांगितली.
मा.श्री.मधुकरराव बनसोडे यांनी आपल्या मनोगतात ‘ शिका संघटीत व्हा व संघर्ष करा ‘ या बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून दिले..तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा व चांगले शिक्षण घ्या व यशस्वी व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम भगत यांनी केले तर आभार श्री विजय सूर्यवंशी यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष मा .श्री.सतीशभैय्या काकडे दे.यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026