प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील बौद्ध विहार पंचशील मित्र मंडळ आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरवात प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमावेळी विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये श्रद्धा अंधश्रधा या विषयावरती जादुगार शिवम यांनी आपल्या जादूतून समाज प्रबोधन केले . मुकिंदा जगताप यांचे लिखित विश्वतेचा वणवा पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस निरीक्षक सचिन काळे ,
सोमेश्वर कारखाना व्हा.चेअरमन मिलिंद कांबळे , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले, ग्रा.सदस्य राहुल आगम , प्रमोद किर्वे, अजित भोसले, दिगंबर कदम, अविनाश (बाबा) शिंदे ,राजेंद्र निंबाळकर , राजेश्वरराजे राजेनिंबाळकर , हरीभाऊ आगम , सुनील खोमणे , मुन्ना बागवान, नानासाहेब मदने , राजकुमार शहा , जितेंद्र पवार , निलेश मदने आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन संजय साळवे व सचिन साळवे , सत्यजीत साळवे यांच्यावतीने करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती जगताप यांनी केले . व आभार संजय साळवे यांनी मानले .