• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! ‘ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे ‘ तू मला होकार दे नाहीतर मी फाशी घेईल असे म्हणत ब्लॅकमेल केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल .
Image

बारामती ! ‘ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे ‘ तू मला होकार दे नाहीतर मी फाशी घेईल असे म्हणत ब्लॅकमेल केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल .

प्रतिनिधी –

” तु मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तु मला होकार दे तू नाही म्हणलीस तर मी फाशी घेईल” असे म्हणत तरुणीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये वडगाव निंबाळकर येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ..
२२ जानेवारी २०२५ रोजी ते २६ एप्रिल २०२५ रोजी वेळोवेळी सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर वाघळवाडी ता. बारामती जि. पुणे येथे फिर्यादी तरुणी ही सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर येथे कॉलेजमध्ये गेले होते व अभ्यासाकरिता आय सी टी रूममध्ये अभ्यास करत असताना आदित्य साळुंखे रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती हा तरुण फिर्यादी तरुणीकडे वाईट भावनेने पाहून तरुणीला म्हणाला की ‘तु मला खूप आवडतेस’ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला होकार दे तू नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन असे म्हणून तरुणीला ब्लॅकमेल करत होता .

तरुणीने आदित्य साळुंखे याला की तू मला त्रास देऊ नको माझे मागे मागे येऊ नको तू माझ्यापेक्षा लहान आहेस असे माझे मनात तुझ्याविषयी काहीही भावना नाहीत तु माझ्या लहान भावासारखा आहे असे म्हणाली तसेच तरुणी हिच्या मनात काही एकरुची नसताना तरुणीने आदित्य साळुंखे यास स्पष्ट नकार दिला असताना देखील आदित्य साळुंखे हा तरुणीच्या काही एक ऐकून न घेता तो त्याची वैयक्तिक रुची वाढवणे करिता तरुणीशी जवळीकता करण्याचा प्रयत्न करून तरुणीशी बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करीत होता .

यावेळी तरुणीने त्याच्या भावाला बोलवून घेते असे म्हणून त्यास फोन मागितला असता त्याने फोन दिला नाही. तरुणी ही रूमचे बाहेर जाऊ लागली असता आदित्य याने तरुणी समोर आडवा उभा राहून अडवले तरुणीने त्या ठिकाणी कशीबशी निघून गेली व पुन्हा घरी जाण्याकरिता निघाली असता आदित्य हा तरुणीस थांबविले त्यावेळेस तरुणीने तुझे नाव माझे घरच्याना सांगेन म्हणल्यावर आदित्य साळुंखे याने माझे नाव घरी सांगितलेस तर मी फाशी घेईल अशी धमकी दिली व तरुणी त्या ठिकाणाहून एका बाजूने निघून गेली व हा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला यावरून तरुणीने आदित्य साळुंखे विरोधात फिर्याद दखल केली .

त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७८ , १२६( २), ३५१ (२),३५१ (३ ) ने गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास  पो हवा भोसले हे करीत आहे .

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025