• Home
  • माझा जिल्हा
  • वडगाव निंबाळकर अंकित करंजे पूल पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई. अवैद्य दारू विक्रेत्याच्या आवळल्या मुस्क्या 
Image

वडगाव निंबाळकर अंकित करंजे पूल पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई. अवैद्य दारू विक्रेत्याच्या आवळल्या मुस्क्या 

प्रतिनिधी.

फिर्यादी.निलेश चंद्रकांत जाधव पो.कॉ.ब.नं.२६९७ नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण.

समक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र मधील संगणक कक्षातील संगणका समोर हजर राहुन सांगतो सरकार तर्फे फिर्यादी जबाब की, मी वरील पोलीस स्टेशनला सुमारे १ वर्षा पासुन पोलीस शिपाई म्हणुन नेमणुकीस आहे.

आज दिनांक २७/०४/२०२५ रोजी दुपारी १३:०० वा चे सुमारास मी तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे साो, पो.हवा.ब.नं.१४५२ आर. एल. नागटिळक, पो.हवा.ब.नं.७१७ ए.एम. भोसले, पो.हवा.२२५९ एस.पी. देशमाने, पो.हवा.७९४ के.ए. कडवळे. जमादार वारुळे असे करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे साो, यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे वाघळवाडी गावचे हददीत कन्नडवस्ती येथे राहते घराचे आडोशाला इसम नामे रणजित विरसिंग रावळकर रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती ता. बारामती जि पुणे हा गावठी हातभटटी तयार दारूची विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे साो, यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करीता दोन पंचाना बोलावुन घेतले त्यांना व आंम्हा पोलीस अंमलदारांना बातमीचा आशय कळविला. पंच, सदर छापा कारवाई करणेकामी येण्यास तयार झाल्यामुळे वरील पोलीस स्टाप व पंच असे खाजगी वाहनाने करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथुन निघुन बातमीचे ठिकाणी जावुन गाडी थोडे अलीकडे वाहन थांबवून थोडे अंतर पायी चालत जाऊन खात्री केली केली असता सदर ठिकाणी एक इसम आपले पुढयात एक ३५ लिटर मापाचे प्लॅस्किचे कॅन्ड घेऊन असलेला दिसला त्यास आंम्ही जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती ता. बारामती जि पुणे असे सांगितले त्यावेळी आंम्ही त्याचे घराचे समोर पाहणी केली असता खालील प्रमाणे प्रोव्हीवेशन गुन्हयाचा मुददेमाल मिळुन आला.

१) ३५,०००/- रूपये किमतीचे एकुन १० प्लॅस्टिकची कॅन्ड, प्रत्येकी ३५ लिटर मापाचे प्रत्येक

कॅन्डमध्ये ३५ लिटर गावठी हातभटटीची तयार दारू. कि.अं.

२) १०००/- रूपये किमतीचे एकुन २ प्लॅस्टिकची पांढरे रंगाचे कॅन्ड, प्रत्येकी कॅन्ड ५ लिटर मापाचे त्यामध्ये एकुन १० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू. कि.अं.

३६,०००/- असा वरील वर्णनाचा व किमतीचा गावठी हातभटटीचा दारूचा माल मिळुन आला तो पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सो यांनी जागीच पंचासमक्ष जप्त करून जप्त मालातुन एका काचेच्या बाटलीत १८० मिली गा.हा.भ ची तयार दारूची रॉम्पल बाटली मा केमीकल अॅना पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यासाठी बाजुला काढुन घेवुन शॅम्पल बाटलीस पंचांचे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सो यांचे सहयांची सिले लेबले जागीच करण्यात आली. छापा घातला ती वेळ १३:२५ वा सुमाराची होती.

तरी आज ता.२७/०४/२०२५ रोजी १३:२५ वा. चे सु ।। मौजे वाघळवाडी गावचे हददीत कन्नडवस्ती येथे राहते घराचे आडोशाला रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती ता. बारामती जि पुणे हा आपले कब्जात बेकायदा एकुन १० प्लॅस्टिकचे कॅन्ड, प्रत्येकी ३५ लिटर मापाचे कॅन्ड त्यामध्ये गावठी हातभटटीची तयार दारू तसेच २ प्लॅस्टिकचे ५ लिटर मापाचे पांढरे रंगाचे त्यामध्ये गावठी हातभटटीची तयार दारू १० लिटर अशी एकुन ३६० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू असा ३६,०००/- किमतीचा मुददेमाल जवळ बाळगले असताना मिळुन आला आहे, म्हणुन माझी रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती ता. बारामती जि पुणे याचे विरूध्द मुंबई. दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. सदरची गोपनीय बातमी पोलीस हवालदार कडवळे यांच्या माध्यमातून मिळाली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.सदरची कारवाई काळे अपर पोलीस अधीक्षक बारामती,‌पोलीस उप अधीक्षक बारामती विभाग, प्रभारी अधिकारी वडगाव निंबाळकर स पो नि काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025