• Home
  • क्राईम
  • टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी, मालवाहू वाहनाची ट्रकला धडक
Image

टोल नाक्याजवळ भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी, मालवाहू वाहनाची ट्रकला धडक

प्रतिनिधी

गिट्टीखदानमधील टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याअतंर्गत नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला.

टाटा एस या चारचाकी वाहन चालकाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. रोशन टेकाम (२५) रा. कळमेश्वर, रमेश देहनकर (५२) रा. ब्राम्हणवाडा आणि रामकृष्ण मसराम (२५) रा. छिंदवाडा अशी मृतकांची नावे आहेत. स्कुटीचालक माणिक महादेवराव बंधराम हे गंभीर जखमी असून यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रविवारी दुपारी तीन वाजता स्कुटी चालक माणिक बंधराम हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता. तर चार चाकी वाहन (इको छोटा हत्ती) चालक रोशन व त्याचे दोन सहकारी हे कळमना बाजारात भाजीची गाडी रिकामी करून कळमेश्वरकडे घरी परत जात होते. निर्मनुष्य रस्ता असल्याने चालक रोशन भरधाव वेगाने चालवित होता.

तो ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याचे वाहन नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या ट्रकवर समोरून धडकले. ट्रक चालकही वेगाने जात असल्याने चारचाकी वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. चालकासह तिघेही जण समोरच्या केबिनमध्ये असल्याने तिघेही रक्तबंबाळ झाले आणि केबिनमध्ये फसले. दरम्यान स्कुटी चालक माणिक हा कळमेश्वरहून नागपूरकडे येत होता.

या दोन वाहनांची धडक स्कुटीला बसली. भीषण अपघात पाहून रस्त्याने जाणारे लोक थांबले. आपपली वाहने थांबवून करून काही लोकांनी केबिनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. रूग्णालयात नेले असता तिघांचाही मृत्यू झाला तर स्कुटीचालक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक शेख रफिक याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांनी स्कुटी चालकाचा जबाब नोंदविला असून त्याने दिलेल्या माहीतीनुसार टाटा एसचा चालक ‘ओव्हरटेक’ करीत होता अधिक तपास करीत आहे.

Releated Posts

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील २.३८ कोटींचा वेतन घोटाळा उघड

प्रतिनिधी लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेतन वाटप विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 12, 2026

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण खून

प्रतिनिधी हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026