• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट ; बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी .
Image

बारामती ! राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट ; बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

कर्नाटक राज्यात झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष संघाने अप्रतिम खेळ करत छत्तीसगड, गोवा, बिहार, कर्नाटक, पुदुचेरी सह अंतिम फेरीत हरीयाणाचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरून विजेतेपद प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच महाराष्ट्र महिला संघाने रौप्यपदक मिळवले असुन संमिश्र संघाने कास्यपदक पटकावत तिहेरी यश संपादन केले.

या संघात खेळाडू म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांचे चिरंजीव बारामतीचे आयान मुनिर तांबोळी यांच्यासह सिद्धेश दरेकर, हर्ष यादव, रणवीर गुळूमकर तसेच बारामतीची महिला संघाची खेळाडू प्रतिनिधी मेहरूनीसा तसलिम शेख हिने संघाचे उपकर्णधारपद निभावले. या बारामतीच्या सर्व खेळाडूंनी भाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्तम खेळाडू म्हणून महाराष्ट्र राज्य संघास प्रथम सुवर्णपदक तसेच रौप्यपदक व संमिश्र संधाने कास्यपदक मिळवून दिले. राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट मिळवून देत मानाचा तुरा रोवला. डॉजबॉल संघाने बारामतीचे नावलौकिक केले.या सर्व खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026