• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी बारामती कृषी अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.
Image

बारामती ! कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी बारामती कृषी अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास सोमवार दिनांक ५ मे पासून सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. कृषि विभाग कृषि सहाय्यक यांचे प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना धरणे आंदोलन बारामती जि. पुणे दिनांक ७ मे २०२५ बुधवार आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून बारामती तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोल करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या प्रमुख मागण्या मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो, कृषी सेवकांचा सेवक कालावधी रद्द करून सेवकांना नियमित कृषी सहाय्यक म्हणून पदावर घ्यावे, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे, सर्व कामकाज डिजिटल स्वरुपात होत असल्याने लॅपटॉप देण्यात यावे, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस देण्यात यावा, त्याचप्रमाणे निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतूद करण्यात यावी व कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी महसूल आणि ग्रामविकास विभाग यांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या कृषी सहाय्यकांच्या आहेत.

तसेच मागण्या मान्य न झाल्यास १५ मे पासून सर्व योजनांचे काम पूर्णपणे बंद करण्याचा इशारा संघटनेने दिलेला आहे. धरणे आंदोलन याप्रसंगी बारामती तालुक्यातील कृषी सहाय्यक संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन खोमणे , सचिव संतोष जायपत्रे तसेच उपस्थित कृषी सहाय्यक मिथुन बोराटे, निरंजन घोडके , देविदास लोणकर , नारायण सोनवणे , विजय गोपने , स्वाती कोकणे ,आरती कांबळे व इतर सर्वजण , इतर पदाधिकारी व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025