मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 May 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! पाठ्यपुस्तक लेखकांचा गौरव करण्यासाठी बारामतीत ‘पंचक्रोशी प्रकाशनचा’ विशेष सोहळा.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 19, 2025 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

पुणे जिल्ह्यातील मराठी साहित्यातील आजी-माजी पाठ्यपुस्तक कवी, लेखक, लेखिका यांचा यथोचित गौरव करण्यासाठी ‘पंचक्रोशी प्रकाशन’ बारामती यांच्या वतीने एक विशेष उपक्रम राबवण्यात येत असल्याचे बाळासो कर्चे यांनी सांगितले . मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा एकत्रित सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून हा सोहळा पुण्याच्या साहित्यक्षेत्रासाठी ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.

या उपक्रमासाठी पंचक्रोशी प्रकाशनकडून पाठ्यपुस्तक लेखकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपला अल्प परिचय नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, पाठ्यपुस्तक लेखनाचे वर्ष, लेखन प्रकार (कथा, कविता, निबंध इ.) आणि शीर्षकासह माहिती बाळासो कर्चे 9545751367 या मोबाईल क्रमांकावर त्वरीत पाठवावी.

याचबरोबर आपल्या माहितीतील इतर पाठ्यपुस्तक लेखकांपर्यंत ह्या उपक्रमाची माहिती पोहोचवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्येः

1. सर्व मान्यवर साहित्यिकांचा एकत्रित सन्मान

2. मराठी साहित्यिकांच्या कार्याला मान्यता

3. समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

‘साहित्यिकांचा सन्मान’ म्हणजे समाजाला दिलेले नवे बळ, असा संदेश देत पंचक्रोशी प्रकाशनचा हा उपक्रम साहित्य व शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख