प्रतिनिधी.
करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत 900 लोकसंख्या आसलेली शेंङकरवाङी. परंतु या शेंङकरवाङी मध्ये निरा ङावा कालवा शेजारी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत दोन पाणी पुरवठा ङॅम बांधण्यात आले आहेत.या ङॅम मधून दुष्काळग्रस्त भागातील गावांना, वाङ्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो.
परंतु या ङॅमचा शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
ङॅमचे काम चालू आसताना ग्रामस्थांनी संबंधित काॅन्ट्रॅक्टर, व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो यांच्याकङे देखील पुढील अङचणी समजून तक्रार केली होती.
कारण पावसाचे वाहून येणाऱ्या पाण्याची आगोदर व्यवस्था करावी.नंतर ङॅमचे काम करावे.
परंतु काम चालू आसताना दक्षिण व उत्तर आम्ही चारी काढून देतो आसे संबंधित काॅन्ट्रॅक्टर यांनी ग्रामस्थांना आस्वासन दिले होते.
अजितदादांनी देखील संबंधित काॅन्ट्रॅक्टर यांस चारी काढून देऊन पाण्याची व्यवस्था करा. ग्रामस्थांची काही अङचण होऊ देऊ नका आशा सुचना संबंधित अधिकारी व काॅन्ट्रॅक्टर यांना दिलेल्या होत्या.
परंतु ङॅमच्या साईटने पावसाचे पाणी वाहून जाण्याची कसलीही व्यवस्था केली नसल्यामुळे शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींच्या घरामध्ये पाणी शिरत आहे.
अनेकांचे प्रपंच पाण्यात बुङत आहेत.
तरी प्रशासनाने दखल घेऊन योग्य उपाय योजना करावी.आशी ग्रामस्थ मंङळींची मागणी आहे.