मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 27 May 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

कऱ्हावागज येथील सर्पदंशाच्या रुग्णाचा वेळेत उपचारांनतरही दुर्दैवी मृत्यू

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 27, 2025 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

पुणे, दि.२७: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कऱ्हावागज येथील कांताबाई शंकर नाळे या रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाचे शरीराने उपचारांना साथ न दिल्यामुळे २६ मे रोजी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश उमप यांनी दिली आहे.

श्रीमती कांताबाई शंकर नाळे यांना २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विषारी सर्पदंश झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये उपचाराकरीता दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर ६ वाजून ३६ मिनिटानी आवश्यकतेनुसार उपचार करण्यास सुरुवात केली. रुग्णाला सर्व प्रथम ‘सर्पविष प्रतिबंधक लस (अँटी स्नेक वेनोम)’ इंजेक्शन दिले. प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला पुढील उपचाराकरिता सकाळी ७.५० वाजता अतिदक्षता विभागामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तथापि, वेळेत उपचार होऊनही शेवटी त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. उमप यांनी प्रसिद्धीपत्रकांवये दिली आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख