• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियानचा कार्यक्रम सदोबाचीवाडी येथे संपन्न.
Image

बारामती ! भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियानचा कार्यक्रम सदोबाचीवाडी येथे संपन्न.

प्रतिनिधी –

दिनांक 29 मे 2025 रोजी केंद्र शासन -भारत सरकार संकल्पित “विकसित कृषी संकल्प अभियान 2025” या शेतकरी अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथून करण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगाव खुर्द,कृषी विज्ञान केंद्र बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांचे संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यामधून करण्यात आली.

सदरील अभियानाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.रतन जाधव यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात राबविलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. त्याचबरोबर राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगाव बु. च्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.रिंकू डे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वनिता साळुंके यांनी सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्यामुळे वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा रोगप्रतिकार करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विकास भालेराव यांनी विद्यापीठांतर्गत तयार करण्यात आलेल्या नवनवीन वाणांची व त्या वाणांच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येणाऱ्या खरीप हंगामात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाणांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले. यावेळी उप कृषि अधिकारी श्री माने , सहाय्यक कृषी अधिकारी श्री निरंजन घोडके व रणजित धुमाळ, आत्माचे श्री गणेश जाधव उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थिती दाखवली.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026