• Home
  • क्राईम
  • विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या
Image

विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या

प्रतिनिधी

छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतीक्षा अभिषेक खळदकर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद, सासू सविता, दीर चेतन, नणंद वैभवी (सर्व रा. धनकवडी), तसेच निर्मला आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रतीक्षाची आई उषा राजेंद्र हरपळे (वय ४३, रा. हरपळे आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचा ११ जून २०२० रोजी अभिषेक खळदकर याच्याशी विवाह झाला होता. हुंड्यात प्रतीक्षाला सात तोळे सोन्याचे दागिने देऊन विवाहाचा खर्चही हरपळे कुटुंबीयांनी केला होता. सासरी नांदत असताना प्रतीक्षाला वेळोवेळी टोमणे मारून तिचा छळ करण्यात आला. छळामुळे ती माहेरी निघून आली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन ६ एप्रिल रोजी आत्महत्या केली. प्रतीक्षाचा छळ केल्याने तिने आत्महत्या केली, अशी फिर्याद तिची आई उषा हरपळे यांनी नुकतीच दिली.

Releated Posts

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील २.३८ कोटींचा वेतन घोटाळा उघड

प्रतिनिधी लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेतन वाटप विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 12, 2026

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण खून

प्रतिनिधी हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026