बीट प्लास्टिक पोल्यूशन’ विषयावर संत निरंकारी मिशनचे व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान देशभरातील १८ तर लोणावळा -खंडाळासह महाराष्ट्रातील ६ स्थानांचा समावेश

Uncategorized

प्रकृती परमात्म्याचा अमूल्य उपहार – तिचे संरक्षण आपली जबाबदारी

पिंपरी, जून ३, २०२५:
प्रकृती मानव जीवनाची सदैव सोबती राहिली आहे, तिच्या सावलीत सभ्यता उदयाला आल्या, संस्कृती विकास पावल्या आणि जीवनाचा सतत विकास होत राहिला. तथापि, मानवाच्या स्वार्थाने जेव्हा संतुलनाची सीमा ओलांडली तेव्हा या जीवनदायीनी प्रकृतीला क्षतिग्रस्त व्हावे लागले. मनुष्य कदाचित हे विसरतो, की तोही या प्रकृतीचेच एक अभिन्न अंग आहे. आज, पर्यावरणाच्या संकटाचे प्रतिध्वनी वैश्विक चेतनेला हलवून सोडत आहे. त्याचाच परिपाक म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी ५ जून रोजी ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित केला जातो.
या वैश्विक पुढाकारातून प्रेरणा घेत सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या लोकमंगलकारी व दूरदर्शी नेतृत्वाखाली संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन संयुक्त राष्ट्रांकडून निर्धारित थीम ‘बीट प्लास्टिक पोल्यूशन’ ला केंद्रीभूत मानून देशभरातील १८ प्रमुख पर्वतीय पर्यटन स्थळांवर ५ जून रोजी सकाळी ८:०० ते दुपारी २:०० या वेळात एक व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान आयोजित करत आहे.लोणावळा आणि खंडाळा येथे मिशनचे स्वयंसेवक सकाळी ८ वाजल्यापासून या परिसरामध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या साहाय्याने वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबवतील. हा प्रयत्न केवळ स्वच्छ, हरित व संतुलित पर्यावरणाच्या दिशेने एक सशक्त पाऊल आहे इतकेच नव्हे तर आजच्या युवापिढीला प्रकृतीच्या बाबतीत संवेदनशील बनवून प्रकृती रक्षणाची भावना व्यवहारात उतरविण्याचा एक प्रेरणादायक पुढाकार देखील आहे. हे एक असे अभियान आहे जे सेवा, सद्भाव आणि सजगतेला जनचेतनेशी जोडण्याचे कार्य करते.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की निरंकारी मिशन सन २०१४ पासूनच संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनाईटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम‘ या पर्यावरण कार्यक्रमाच्या थीमवर ‘विश्व पर्यावरण दिवस’ आयोजित करत आहे. हे केवळ एका दिवसाचे आयोजन नसून एक सतत जनचेतना अभियान आहे जे प्रकृती आणि मानवता यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना पुन्हा सशक्त करते.
या महाअभियाना अंतर्गत देशातील प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या विविध १८ प्रमुख पर्वतीय व पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पांचगणी, खंडाळा, लोनावळा, पन्हाळा व सोमेश्वर; उत्तराखंडमधील मसूरी, ऋषिकेश, लेन्सडाउन, नैनीताल, चकराता व भवाली; हिमाचल प्रदेशातील सिमला, मनाली आणि धर्मशाला; गुजरातमधील सापुतारा; सिक्किममधील गीजिंग आणि कर्नाटकातील सुरम्य नंदी हिल्स उल्लेखनीय आहेत. ही स्थळे केवळ प्रकतीच्या कुशीत वसलेली आहेत असे नसून पर्यावरण जागृतीच्या बाबतीत असे केंद्रबिंदू बनत आहेत जिथे निष्काम सेवा आणि सहभाग एकत्रितपणे साकार होत आहे.
या प्रसंगी मिशनचे स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण व स्थानिक नागरिक एकोप्याने प्रार्थनेत सहभागी होऊन कार्यक्रमाची सुरवात करतील. त्यानंतर युवा स्वयंसेवक पथनाट्ये, सांस्कृतिक प्रस्तुती आणि रचनात्मक संदेशाच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचा दुष्प्रभाव आणि त्यावरील उपाययोजना यावर जनजागृती करतील. शिवाय, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक व बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार करुन यावेळी समाजाला प्रेरणा दिली जाणार आहे.
या विश्व पर्यावरण दिवस प्रसंगी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशचा हा एक समर्पित प्रयास एक सार्थक संदेश देत आहे. या तर, सर्व मिळून पर्यावरणाचे रक्षण करुया ज्यायोगे भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, सुंदर आणि संतुलीत पृथ्वी सजवली जाऊ शकेल.