• Home
  • माझा जिल्हा
  • उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजन
Image

उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजन

प्रतिनिधी.

अधिकारी कार्यालय बारामती व इंदापूर तहसीलदार कार्यालयांमध्ये सोमवार दि.9 जून रोजी ‘महसूल लोकअदालत’ आयोजित केली आहे. महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोकअदालत पार पडणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

महसूल विभागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दावे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र, या लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांचे एकमत झाल्यास तडजोडीतून दावे निकाली काढले जाणार आहे. ही महसूल लोक अदालत उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व तहसिल कार्यालय इंदापूर येथे सकाळी 11 वाजलेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील. सर्व तडजोड होऊ शकेल अशा दाव्यातील पक्षकारांनी प्रकरण लोकअदालतीत मांडून मार्ग काढावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी केले आहे.
0000

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025