प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानची रविवार दि ८ रोजी नटराज कला मंदिर बारामती येथे संघटना स्थापन करण्यासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आलेली होते. या मीटिंगसाठी सर्व मान्यवर उपस्थित होते. या बैठकी दरम्यान प्रथम नटराज यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . तसेच अहिल्यादेवी मातेचे आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सामाजिक संघटनेच्या स्थापनेसाठी संघटनेचे ध्येय उद्दिष्ट ठरवण्यासाठी गजानन भगत, महेंद्र खटके, निखिल विठ्ठल बाराते, ॲड सचिन शिवाजी कोकणे, सुरेश मुगूटराव गावडे, आबासाहेब सूळ,. निखिल बाराते, अनिल आवाळे, नामदेव गावडे, राजेंद्र गावडे, विजय ताई कर्णावर .ॲड स्वप्नाली आटोळे, रेश्मा राजू इमडे, संपत गाढवे, मच्छिंद्र चाटे, अक्षय आबा शिपकुले,. सतिष गणपत गावडे, सतीश भाऊसाहेब गावडे, सोमनाथ बाळू गावडे, किरण गौड, विनोद आबासो खोमणे, अरविंद संजय वाघमोडे, लखन उमाजी बोडरे सह इतर समाज बांधव उपस्थित होते.