• Home
  • माझा जिल्हा
  • परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पुरवणी मागण्यांमधून आणखी 20 कोटींची तरतूद
Image

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पुरवणी मागण्यांमधून आणखी 20 कोटींची तरतूद

आ. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला आले यश**परळी वैद्यनाथ कॉरिडॉर साठीही करणार मागणी

परळी – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून परळीकरांसाठी एक आनंदाची बातमी असून 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यातील वीस कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून मान्यता दिली आहे. यासाठी माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना धनंजय मुंडे यांनी नगर विकास विभागाचा माध्यमातून सुमारे 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता प्राप्त करून दिली होती. यातून याआधीही एका भव्य भक्त निवासासह विविध कामे करण्यात येत आहेत. आता आणखी 20 कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मधून मंजूर झाले आहेत.परळी शहर हे प्रभु वैद्यनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे अतिशय क्षेत्र आहे या ठिकाणी महाशिवरात्री सह विविध निमित्ताने लाखो शिवभक्त देशभरातून परळी येथे दर्शनासाठी येतात . मात्र परळी वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच शहरांमध्ये त्या दृष्टीने भाविकांसाठी पूरक सुविधा उपलब्ध नाहीत. याचा विचार करून राज्य शासनाने ज्या पद्धतीने नुकताच पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला व त्यास 300 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला त्याच धर्तीवर परळीला देखील परळी वैद्यनाथ कॉरिडॉर मंजूर करून येथे 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडे या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्यांमधून मंजूर केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी समस्त परळीकर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026