Image

पुणे शहरात घरफोडीच्या घटना, दहा लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी

शहरात मध्य भागातील गणेश पेठ, तसेच खडकी भागात घराचे कुलूप तोडून चोरांनी दहा लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. गणेश पेठेतील हमजेखान चौकात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा सहा लाख ८५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हमजेखान चौकातील एका इमारतीत राहायला आहेत. ८ जून रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

खडकीतील रेंजहिल्स भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार १३ जून रोजी सकाळी घर बंद करून बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

कोथरूडमध्ये वस्त्रदालनातून सहा लाख ८४ हजारांचे कपडे चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे पौड रस्त्यावर वस्त्रदालन आहे. चोरट्यांनी वस्त्रदालनाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी दुकानातील सहा लाख ८४ हजारांचे विविध प्रकारचे कपडे चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करत आहेत.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025