प्रतिनिधी.
जगातील सर्वात खडतर अशी मानली जाणारी महा मॅरेथॉन स्पर्धा साऊथ आफ्रिका येथे पार पडते या स्पर्धेमध्ये जवळपास 90 किलोमीटरचे अंतर पार पाडायचे असते.
या स्पर्धेसाठी सुजित काकडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अथक प्रयत्न परिश्रम घेतले होते मागील झालेल्या आठवड्यामध्ये त्यांनी 90 किलोमीटरचे अंतर नऊ तास 43 मिनिटांमध्ये पार करीत यशाला गवसणी घातली त्याबद्दल नींबूत ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुजित काकडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी निंबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, दत्तात्रय काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, सोमेश्वर चे माजी संचालक महेश काकडे, इंद्रजीत काकडे, संभाजीराव काकडे, मनोज काकडे, सागर काकडे, सुमित काकडे. याचबरोबर नवकेतन तरुण मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते