• Home
  • माझा जिल्हा
  • प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर…
Image

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन दि.२४,२५ व २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या महोत्सवानिमित्त
रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता जि- अहिल्यानगर
या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर
या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-
प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने “प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता”
या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा “विशेष सन्मान” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे.
प्रा. हनुमंत माने यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे. व संभाषण कौशल्य विकसित व्हावे. यासाठी संभाषण कला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे.
प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने गेल्या १७ वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवींच्या निवडक कवितांचा सहभाग असलेल्या २१ प्रातिनिधीक कविता संग्रहाचे संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे.
ते स्वतः प्रतिभावंत कवी, लेखक, निवेदक, सूत्रसंचालक, प्रभावी वक्ते व मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.
सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन, निवेदन, व्याख्यानमाला, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र व मुलाखत इ. उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.
आजपर्यंत त्यांच्या या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्तरावर विविध संस्थांनी १३ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026