• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयाची ५३ वर्षात वैभवशाली प्रगती- डॉ. प्रशांत साठे
Image

काकडे महाविद्यालयाची ५३ वर्षात वैभवशाली प्रगती- डॉ. प्रशांत साठे

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा ५३ वा वर्धापन दिन २० जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॄहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रोफेसर मा. डॉ. प्रशांत साठे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभासदस्य तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यातील तरतुदी, महाविद्यलयाच्या समोरील संधी आणि नवी आवाहने याबाबत सविस्तर विवेचन केले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालयाचे सचिव श्री सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी ते म्हणाले ५३ वर्षात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले, यावेळी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमान्यामध्ये आपली बुद्धिमत्ता ही कृत्रिम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण महागड्या वस्तू वापरल्या म्हणजे बुद्धिमान नसून बुद्धीच तुम्हाला वरच्या दर्जा वरती नेऊन ठेवते. अनुभूती व अनुभवातून शिक्षण घेऊन त्या शिक्षणातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताला जर विकसित करायचे असेल तर ‘PUARA- Provision of Urban Amenities to Rural Area’ नावाचे तत्त्वज्ञान वापरले पाहिजे तरच भारत हा विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला. या महाविद्यालयाने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली ही एक अभिमानाची गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचे आहे, कोणतेही काम करत असताना पुढील पाच ते सात वर्ष नियोजन आराखडा आपल्या जवळ असला तरच तो जीवनात यशस्वी होऊ शकतो असे आवर्जून सांगितले आणि शेवटी त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आधिसभा सदस्य ॲड. मा.संदीप कदम यांनी महाविद्यालयाने ५३ वर्षात तळागाळातील, वंचित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन केलेले प्रगती हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे आवर्जून सांगितले. आज महाविद्यालय ५३ वर्षांचा खडतर प्रवास करून यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आहे यासाठी चार घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे ते घटक म्हणजेच व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या योगदानामुळेच ते शक्य झाले आणि शेवटी. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाने केलेल्या प्रगती आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी या विषयी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय मनोगता मध्ये अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले म्हणून त्यांचे स्वागत व आभार मानले व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी मानले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025