प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मु.सा काकडे महाविद्यालयात योग प्रशिक्षक सुधीर साळवे यांचे व्व्याख्यान आणि योग प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.श्री.साळवे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले व सप्रत्यक्षिक योगाचे प्रकार करून दाखवले.महाविद्यलयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विधार्थी उपस्थित होते .या प्रसंगी संस्थेचे सचिव सतीश लकडे सर्व विभागांचे उपप्राचार्य व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी योग दिनाचा विषय “एक पृथ्वी एक आरोग्य”(YOGA FOR ONE EARTH ONE HEALTH) असा आहे यातून आरोग्य सुसंवाद आणि सजगता वाढीस लावणे असा या योग उपक्रमाचा उद्देश आहे. योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक डॉ.बी.एन मरगजे यांनी केले वआभार प्रा. दत्तराज जगताप यांनी मानले.
