गोवर आणि रुबेलाच्या उच्चाटनासाठी सरकारने तयार केला देशव्यापी पथदर्शी आराखडा

Uncategorized

प्रतिनिधी

लक्ष ठेवणे, लसीकरण, वेळेवर निदान आणि जनजागृती भक्म करणे आवश्यक

देशातील काही राज्यांमध्ये अलीकडे गोवर संसर्गात झालेल्या वाढीची सरकारने दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्यात 12 डिसेंबरपर्यंत, एकूण 3,075 जणांना गोवरचा संसर्ग झाला असून यामुळे 13 मृत्यूची नोंद झाली आहे. इतर काही राज्यांमध्येही 2022 मध्ये गोवर संसर्गाची नोंद झाली आहे.झारखंड, गुजरात आणि केरळमधील काही जिल्हे/शहरांमधे वाढलेल्या रुग्ण संख्येची दखल घेऊन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य तज्ञ, बालरोगतज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचा समावेश असलेली विशेष केंद्रीय पथके तैनात केली आहेत.

रोग निरिक्षण प्रक्रीया अधिक बळकट करणे, गोवर प्रतिबंधक लसीकरण वाढवणे, लसीकरणाचाबाबतचा संकोच दूर करणे, लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यासाठी सामुदायिक जागरूकता मोहीम तीव्र करणे , वेळेवर तपासणी, संदर्भ आणि वैद्यकीय व्यवस्थापनाद्वारे रुग्ण व्यवस्थापन सुधारणे आवश्यक असल्याचे केंद्रीय पथकांनी नमूद केले आहे. केंद्रीय पथकांचे निष्कर्ष त्यांच्या शिफारशींसह औपचारिकपणे संबंधित राज्यांना देखील कळवले होते जेणेकरून ते गोवर रुग्णवाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ती कारवाई करू शकतील. याकामी मदत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधला आहे.गोवर आणि रुबेला निर्मूलनासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात आला असून तो संपूर्ण भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केला आहे.

गोवर आणि रुबेला लसीकरण आणि लक्ष ठेवणे यासह निर्मूलन मोहिमेचे नियोजन करण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शन साधन आहे.याव्यतिरिक्त, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड यांना उद्रेक साथीचा उद्रेक झाल्यानंतर करावयाच्या प्रमुख कृतींबाबत विशिष्ट सूचना जारी केल्या आहेत. गोवर आणि रुबेला निर्मूलन संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी 20 डिसेंबर 2022 रोजी राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.