मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

नागपूर ! पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई बिग्रेट च्या पुर्व विदर्भ अध्यक्ष पदी वर्षाताई देठे यांची नव्याने निवड.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 19, 2023 1 मिनिट वाचन 8,516 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

नागपूर सीताबर्डी येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयात प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वात महिलांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश घेण्यात आला.

यात पुर्व विदर्भ रमाई बिग्रेट च्या अध्यक्ष पदी वर्षाताई देठे यांची नियुक्ती करण्यात आली तर नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी सुधा मस्के यांची नियुक्ती करण्यात आली.

नागपूर शहर महिला आघाडीच्या
नागपूर शहर च्या कार्यकारिणीत
संघमित्रा प्रेमदास पाटोळे व कुसुमताई सिद्धार्थ गेडाम यांचा समावेश आहे.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या प्रतिमाताई कवाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई बिग्रेट पुर्व विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा ताई देठे यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे व महिलांच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व सहकार्य करणार आहे. नागपूर,वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याची जबाबदारी आता पुर्व विदर्भ रमाई बिग्रेट च्या अध्यक्षा वर्षाताई देठे यांच्याकडे आहे.

यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, अजय चव्हाण,प्रणय हाडके,बाबा बोरकर, महेंद्र नागदिवे,दिलीप पाटील, गौतम गेडाम, शेखर बोरकर, भिमराव कळमकर यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख